मतदानाबाबत कर्तव्यभावना जागृत झाली तरच लोकशाही बळकट!-तहसीलदार मिलिंदकुमार वाघ

0

▶️ अमळनेरला राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त बक्षीस वितरण

अमळनेर (प्रतिनिधी) कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदारांनी निर्भिडपणे मतदान करावे. योग्य उमेदवाराला निवडून द्यावे. मतदानाबाबत लोकांच्या मनात कर्तव्यभावना जागृत झाली तरच आपली लोकशाही बळकट होईल, असे मत तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय मतदार दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय (जळगांव) यांच्या माध्यमातून विविध स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते.

येथील प्रताप महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, गटशिक्षणाधिकारी आर डी महाजन, नायब तहसीलदार नवनाथ लांडगे, पालिकेचे प्रशासन अधिकारी संजय चौधरी, प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य पी आर शिरोडे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निबंध, रांगोळी, वकृत्व, मीम, लघुपट, चित्रकला, घोषवाक्य, परीसंवाद व गीतगायन या विविध स्पर्धां घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये प्रथम व व्दितीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्याना प्रमाणपत्र वाटप करण्यांत आले. जिल्हास्तरावर उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून दिनेश पालवे, उत्कृष्ट महसुल सहायक म्हणून नितीन राजेंद्र ढोकणे, उत्कृष्ट मतदार नोदंणी अधिकारी म्हणून सीमा अहिरे, गटशिक्षणाधिकारी आर डी महाजन, प्रा धनंजय चौधरी यांचाही सन्मान करण्यात आला. युवा मतदाराना डिजिटल मतदान ओळखपत्र वाटप करण्यांत आले.

▶️ जिल्हास्तरावर प्रथम

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत विजयनाना पाटील आर्मी स्कूलचा विद्यार्थी निरज प्रभाकर कोळी तसेच ऍड ललिताताई पाटील इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी वसुंधरा सचिन शिंदे या दोघांनी जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळविला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आर्मी स्कूल चे प्राचार्य पी.एम.कोळी, शिक्षिका प्राजक्ता शिंदे, शिक्षक उमेश काटे, कलाशिक्षिका पल्लवी पाटील, मयूर पाटील आदी उपस्थित होते. निरज हा आर्मी स्कूल चे प्राचार्य पी.एम.कोळी यांचा मुलगा तर वसुंधरा ही आर्मी स्कुल व ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षिका प्राजक्ता शिंदे यांची मुलगी आहे. प्रा धनंजय चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा अवित पाटील यांनी आभार मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!