टायगर किड्स इंटरनॅशनल स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

पारोळा (प्रतिनिधी) येथील टायगर किड्स इंटरनॅशनल स्कूल मध्ये 73 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून भारतीय सेनेतील अधिकारी मा.श्री गणेश देवीदास पाटील आणि एकनाथ पाटील रा.देवगाव यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी नर्सरी जूनियर आणि सीनियर केजीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य, संभाषणे आणि वेशभूषा अशा विविध कार्यक्रमांचे सादरीकरण केले.
कार्यक्रमात संचालक श्री. रवींद्र पी.पाटील आणि प्राचार्य श्रीमती रूपाली आर. पाटील यांनीदेखील विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले.
उपप्राचार्य आणि शिक्षिका वृंद यांनी कार्यक्रमाचे यशस्वीरित्या नियोजन केले.