पालकमंत्री यांच्या निवासस्थानाबाहेर पेंटिग काढून केला निषेध!

धरणगाव (प्रतिनिधी) जिल्ह्याचे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानाबाहेर विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकाचे निषेध म्हणून पेंटिग काढून भारतीय जनता युवा मोर्चाने अनोखे आंदोलन केले आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याच वाटोळं करणारं विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक (काळे विधेयक) सरकारने त्वरित मागे घ्यावे या मागणी करिता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानासमोर निषेध रांगोळी काढून जळगाव भाजपा युवा मोर्चाने निषेध व्यक्त केला. आज भाजयुमोच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात मंत्र्यांच्या घराबाहेर निषेध रांगोळ्या काढून हे काळे विधेयक मागे घेण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे.जो पर्यंत हे काळे विधेयक मागे घेतले जाणार नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांसाठी हा संघर्ष सुरूच राहणार आहे. हे आंदोलन युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन यांच्या नेतृत्वात, प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, प्रदेश सचिव भैरवीताई वाघ- पलांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी जळगाव युवा मोर्चा चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
