जागृतीदेवी पाटील यांना लोकमान्य गटाची उमेदवारी जाहीर!

पारोळा (प्रतिनिधी) येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय येथे सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकमान्य गटाचे नेते गंजिधर पाटील होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्वर्गीय हनमंतराव पवार यांच्या प्रतिमेस व सरस्वती मातेचे पूजन करून वंदन करण्यात आले .व्यासपीठावर लोकमान्य गटाचे अध्यक्ष विलास नेरकर, संजीव निकम (कोषाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना ), जेष्ठ मार्गदर्शक केशव झांबरे दादा,पीतांबर किरंगे,पदवीधर शिक्षक महासंघ अध्यक्ष गिरीष वाणी, ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष भैय्यासाहेब पवार ,संदीप घोरपडे , नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रभाकर सोनवणे, ग.स.मा.अध्यक्ष डॉ. रवींद्र साळुंके, साहेबराव जिभाऊ, सुरेश आप्पा पाटील,आर.बी.पवार, एस.टी.पाटील, रावसाहेब एक.जी. निकम,अजिंक्य पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक जागृतीदेवी पाटील यांनी केले .कार्यक्रमात लोकमान्य गटाचे अध्यक्ष विलास नेरकर संजीव निकम, संदिप घोरपडे, किरंगेदादा,आर. बी.पवार आदी मान्यवरांनी गटाची ध्येय धोरण व मार्गदर्शन केले. कार्यक्रमात सुरक्षित अंतर ठेवून मास्क व सनीटाईजर चा वापर करण्यात आला होता. या कार्यक्रमात श्रीमती जागृतीदेवी पाटील यांच्या नावावर एकमुखी निर्णय घेऊन लोकमान्य संस्थापक प्रगति गटाची उमेदवारी देण्यात आली. याप्रसंगी ग.स.सोसायटी मा.उपाध्यक्ष राजेश पवार, मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील, कनिष्ठ महाविद्यालय पतपेढीचे अध्यक्ष राजेश पाटील , जुक्टो संघटनेचे उपाध्यक्ष विजयकांत पाटील, मुख्याध्यापक संचटनेचे विनोद माने, टि.डी.एफ संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, ग्रामसेवक पतपेढीचे मा.अध्यक्ष सुनिल पाटील,शिक्षक संघटनेचे मा.तालुका अध्यक्ष पतंगराव पाटील,विश्वास सुर्यवंशी.सुनिल पाटील, अजित पाटील, अत्तरदे सर, नन्नवरे भाऊसाहेब,गजानन गव्हारे ,घोरपडे मॅडम, चित्रा साळुंखे मॅडम, जयवंतराव पवार, प्रविण पवार आदी उपस्थित होते.यशस्वीतेसाठी सुनील पाटील,लोकमान्य गट कार्याध्यक्ष गुणवंतराव पाटील, विलास मोतारीम (व्ही.एम.)पाटील , शरदराव हणमंतराव पवार ज्ञानदीप व लोकमान्य मित्र परिवार यांनी मेहनत घेतली .सूत्रसंचालन प्रा.बी.एन.पाटील यांनी केले.