अमळनेर येथे राजमाता जिजाऊनां मानवंदना !

अमळनेर (प्रतिनिधी) येथील मराठा सेवा संघ व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने शहरातील तहसील कार्यालयासमोरील माँ जिजाऊ प्रवेशद्वार वरील प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.
यावेळी शिवव्याख्याते प्रा डॉ लिलाधर पाटील यांनी उपस्थित जन समुदया समोर राजमाता जिजाऊ यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत सर्वांनी माँसाहेब जिजाऊ च्या चरित्राचे वाचन करून आपल्या कुटुंबातील महिलांना जिजाऊंची प्रेरणा देऊन स्वकर्तुत्वाने जगण्याची ताकत द्यावी, असे संबोधले. यावेळी प्रा लिलाधर पाटील, नगरसेवक श्याम पाटील, एस एम पाटील, अहिरराव सर, ठाकरे सर, रणजित शिंदे, प्रा डॉ विलास पाटील, आर बी पाटील, कैलास पाटील, संदिप खैरनार, बी एल सैदाने, जयेशकुमार काटे, श्रीकांत चिखलोदकर, अनंत सूर्यवंशी, अशोक पाटील, चंद्रकांत पाटील, प्रेमराज पवार, निंबाजी पाटील, विजय गाढे, आत्माराम अहिरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान नगरसेवक श्याम पाटील यांच्या कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत राजमाता जिजाऊ व विवेकानंद यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी संदीप खैरनार यांनी मराठा सेवा संघ शिवधर्म दिनदर्शिका चे वितरण केले.