विजय प्रभाकर पाटील यांचे दुःखद निधन

अमळनेर-तालुक्यातील हिंगोणे खु.प्र.ज. येथील मूळ रहिवासी तथा अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक विजय प्रभाकर पाटील वय 51 यांचे आज दि 19 रोजी सायंकाळी 5.30 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा उद्या दि 20 रोजी सकाळी 11 वाजता हिंगोणे खु.प्र.ज ता.अमळनेर येथे पार पडणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,1 मुलगा,1 मुलगी, वडील, 2 भाऊ असा परिवार असून अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांचे ते चुलत बंधू तर संजय प्रभाकर पाटील व श्यामकांत प्रभाकर पाटील यांचे ते बंधू होते.