कुसुमबाई वैष्णव यांचे निधन

अमळनेर (प्रतिनिधी) येथील पिंपळे रस्त्यावरील श्रीरंग कॉलनीतील रहिवासी कुसुमबाई रतिलाल वैष्णव (वय-७०) यांचे 8 जानेवारी रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, जावई, सुना व नातवंडे असा परिवार आहे. प्रताप तत्वज्ञान केंद्राच्या सल्लागार समितीचे सदस्य तथा प्रताप महाविद्यालयातील इंग्रजीचे प्राध्यापक प्रा. डॉ.धिरज वैष्णव व माध्यमिक शिक्षक हेमंत वैष्णव यांच्या त्या मातोश्री होत.