पल्लवी पाटील मॅडम आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित!

शहादा (प्रतिनिधी) 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने महात्मा फुले युवा मंच ऑल इंडिया यांच्यावतीने शहादा जिल्हा – नंदुरबार या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात मा.आमदार विजयकुमार गावित, खासदार हिनाताई गावित तसेच ईश्वर माळी व भगवान रोकडे , महात्मा फुले युवा मंचच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जैतपीर तालुका-अमळनेर येथील माध्यमिक विद्यालयात कार्यरत असलेल्या उपशिक्षिका श्रीमती. पल्लवी रामकृष्ण पाटील यांना आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्याबद्दल त्यांच्या शाळेचे संस्थापक अध्यक्ष मयूर सोनार व संस्थेचे कार्यकारी व्यवस्थापक पवन माळी यांनी अभिनंदन केले .शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक,शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने अभिनंदन व स्वागत सत्कार करण्यात आला.