तालुका वकृत्व स्पर्धेत जिराळी इंधवे येथील अपेक्षा पाटील अव्वल!

0

पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील जिल्हा माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आयोजित विद्यार्थ्याच्यां सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी आयोजीत इयत्ता ५ ते ७, इ ८ ते १० व इयत्ता ११ वी १२ वी या तीन गटात विवीध स्पर्धाचें आयोजन मुख्याध्यापक महामंडळाने यांनी केलेले होते. त्यात पारोळा तालुक्यातुन इयत्ता ८ ते १० वी गटातून तालुक्यातून प्रथम व एकमेव विद्यार्थी जिल्हास्वरावर माध्यमिक विद्यालय जिराळी इंधवे शाळेतील अपेक्षा सुनिल पाटील हिने इयत्ता ८ ते १० वी गटात , प्रथम क्रमांक घेतलेने रोख बक्षीस व प्रमानपत्र देऊन गौरवण्यात आले व जिल्हास्तरावर निवड करण्यात आली .दि १३ जानेवारी रोजीच्या जिल्हास्तरावर आयोजीत स्पर्धेत सहभाग मिळवला.
सदर स्पर्धा बालाजी विद्यालय पारोळा येथे डॉ सचीन करोडपती यांचे अध्यक्षतेत व गटशिक्षणाधिकारी कवीता सूर्वे , शालेय पोषण आहार अधिक्षक चंद्रकात चौधरी , जिल्हा विद्याशाखा सहसचीव गणेश जाधव , डॉ शांताराम पाटील , विनोद पाटील , विजय बडगूजर यांच्या प्रमुख उपस्थीतीत अत्यंत पारदर्शी व निकोप वातावरणात पार पडली . एकून ४८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
अपेक्षाचे एरंडोल पारोळाचे आमदार चिमणराव पाटील , मा. नगराध्यक्षा नलीनीताई पाटील बाजार समीती सभापती अमोल पाटील व मुख्याध्यापक गणेश जाधव यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या .तिला संदेश माने , दिपक पाटील , राजेंद्र पाटील , प्रा. जी.एम. पाटील , प्रा. पी.आर पाटील , प्रा.एम आर चौधरी, धनराज पाटील ,सिद्धार्थ जावळे , मगध मोरे व अशोक पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!