मिनी लॉकडाऊनची घोषणा; शाळा,पर्यटन स्थळ बंद,जमाव बंदी लागू!

मुंबई (प्रतिनिधी) महाराष्ट्राचा कोरोना रुग्णांचा आकडा ४० हजारांच्या पार गेलाय तर एकट्या मुंबईने २० हजारांचा आकडा क्रॉस केलाय. या संपूर्ण पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात मिनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार राज्यात रात्रीची संचारबंदी लागू असणार आहे. तर सकाळी ५ ते रात्री ११ जमावबंदी लागू असेल.
▶️ सकाळी जमावबंदी, रात्री नाईट कर्फ्यू, कसं असेल राज्यातलं मिनी लॉकडाऊन!
▶️ राज्यात हे सुरु राहणार
▶️ राज्यातील चित्रपटगृह आणि नाट्यगृह 50 टक्के क्षमतेनं सुरु राहणार
▶️ पहिल्या लाटेमध्ये सलून चालकांचं आणि कामगारांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे आता 50 टक्के क्षमतेनं सलून चालविण्याची मुभा
▶️ खासगी कार्यालये 50 टक्के क्षमतेनं सुरु राहणार
▶️ हॉटेल रेस्टॉरंट रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी
▶️ शॉपिंग मॉल ५० टक्के क्षमतेने सुरु राहणार
▶️ पूर्ण लसीकरण झालेल्यांना सार्वजनिक बसने वाहतूक करण्यास परवानगी
▶️ राज्यात हे बंद राहणार
▶️ खेळाची मैदानं, उद्यानं, बागा, बंद
▶️ राज्यातील सगळी पर्यटन स्थळ पूर्णपणे बंद राहणार
▶️ स्विमिंग पूल, स्पा, व्यायामशाळा पूर्णत: बंद राहणार
▶️ एंटरटेन्मेंट पार्क, प्राणीसंग्रहालये, संग्रहालये, गडकिल्ले पुढील आदेशापर्यंत बंद
▶️ शाळा कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद
▶️ लग्न आणि अंत्यसंस्कारासाठी नियमावली
▶️ लग्नाचं शुभकार्य फक्त ५० लोकांच्या उपस्थितीमध्ये करण्याची परवानगी
▶️अंत्यसंस्कारावेळी २० लोकांना उपस्थित राहण्यास मुभा
▶️ सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना ५० लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी