खानदेश गौरव (कै) रुख्मिणीताई स्मृती चषक क्रीडा व बौद्धिक स्पर्धा संपन्न!

अमळनेरला विजयनाना पाटील आर्मी स्कुलमध्ये बक्षीस वितरण
अमळनेर (प्रतिनिधी) येथील विजय नाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये आज खानदेश गौरव (कै) रुख्मिणीताई स्मृती चषक क्रीडा व बौद्धिक स्पर्धा- 2021- 2022 अंतर्गत विविध स्पर्धा घेण्यात आल्या. माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष अनिकेत पाटील यांच्या आदेशानुसार व प्रशासकीय अधिकारी डी बी पाटील, मानद शिक्षण संचालक प्रा सुनील गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या विविध स्पर्धेतील यशस्वी गुणवंताना शिक्षण विस्तार अधिकारी पी डी धनगर यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. (कै) रुख्मिणीताई यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डी बी पाटील हे अध्यक्षस्थानी होते. कवी प्रभाकर शेळके, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी के वाय देवरे, प्राचार्य पी एम कोळी, सुभेदार मेजर नागराज पाटील, एस ए बाविस्कर, उमेश काटे हे उपस्थित होते. सौ पी एस शिंदे व शरद पाटील यांनी सूत्रसंचालन तर केले. एस ए बाविस्कर यांनी आभार मानले. दरम्यान काल आर्मी स्कुलमध्ये रंगले क्रिकेटचे सामने रंगले. या स्पर्धेचे उद्घाटन आर्मी स्कूल चे प्राचार्य पी एम कोळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ शिक्षक एस ए बाविस्कर सर, क्रीडाशिक्षक आर ए घुगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सांस्कृतिक विभाग प्रमुख उमेश काटे सर यांनी सूत्रसंचालन केले.

▶️ स्पर्धेचा निकाल असा-
सामान्य ज्ञान स्पर्धा – (लहान गट) प्रथम- ज्ञानदीप कुलकर्णी, द्वितीय- मयुर पाटील, तृतीय- स्निकेत पाडवी (मोठा गट) प्रथम- विलास तडवी, द्वितीय- अक्षय पाटील, तृतीय- समीर तडवी, परीक्षण-ए ए वानखेडे, एस ए वाघ.
वकृत्व स्पर्धा (लहान गट) प्रथम- मयुर पाटील,द्वितीय- हर्षवर्धन पाटील, तृतीय – रोहित पाटील (मोठा गट) प्रथम- यश महाजन, द्वितीय- सावन चौहान, तृतीय- दिवेश झाल्टे,परीक्षण- टी के पावरा, अनिल पाटील
निबंध स्पर्धा (लहान गट) प्रथम- संदेश कोकणी, द्वितीय -दक्ष पाटील, तृतीय- पियुष पाटील (मोठा गट) प्रथम-यश महाजन, द्वितीय -जयेश पाटील, तृतीय- कुणाल मोरे, परीक्षण- वाय वाय पाटील,आर एस शिरसाठ
फायरिंग स्पर्धा– प्रथम- अमन साळवे, द्वितीय- गणेश सोनवणे, तृतीय- पिंटू बारेला.
पुश अप स्पर्धा – प्रथम- सावन चौहान, द्वितीय-ललित पावरा, तृतीय- जयेश पाटील
पुल अप्स स्पर्धा- प्रथम – रोहित देवरे, द्वितीय -जयेश पाटील, तृतीय- संदीप पावरा,विलास तडवी, रोहित पारधी.
बेस्ट स्टुडंट इन ड्रिल -(लहान गट) मयुर पाटील (मोठा गट) पिंटू बारेला.
परीक्षण- सुभेदार मेजर नागराज पाटील, नायब सुभेदार भटू पाटील, हवालदार डी पी बोरसे, एस बी पवार संजय पाटील
क्रिकेट स्पर्धा (लहान गट) विजेता- आठवी ब, उपविजेता- सहावी अ (मोठा गट) विजेता- दहावी ब, उपविजेता -अकरावी ब
क्रिकेट समालोचन – उमेश काटे, शरद पाटील,वाय पाटील,पंच -दीपक पाटील सलीम तडवी स्कोरर -आर ए घुगे, वाय के भोई
रांगोळी स्पर्धा (लहान गट) प्रथम-अक्षय पाटील,रोहित पाटील
द्वेतीय-वैष्णव पाकळे, देवेश भोखरे,
तृतीय- मयूर पाटील,लकी शिरे
(मोठा गट) प्रथम-यश महाजन,चंद्रकांत पाटील
द्वितीय- तुषार राठोड,तृतीय-हितेश माळी, भावेश माळी
परीक्षण- गोपाल हाडपे, ए ए वानखेडे, शिवाजी पाटील, पी सी पाटील, उमेश काटे, शरद पाटील
