अमळनेरच्या विजयनाना पाटील आर्मी स्कुलमध्ये रंगले क्रिकेटचे सामने

अमळनेर (प्रतिनिधी) येथील विजय नाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये आज खानदेश गौरव (कै) रुख्मिणीताई स्मृती चषक क्रीडा व बौद्धिक स्पर्धा- 2021- 2022 अंतर्गत क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचे उद्घाटन आर्मी स्कूल चे प्राचार्य पी एम कोळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ शिक्षक एस ए बाविस्कर, क्रीडाशिक्षक आर ए घुगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सांस्कृतिक विभाग प्रमुख उमेश काटे यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास व्हावा या उद्देशाने क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. क्रिकेट स्पर्धेत सहावी ते बारावीच्या सुमारे १५० खेळाडूंचा सहभाग घेतला. संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डी बी पाटील यांनी क्रिकेट सामन्यांना उपस्थिती देऊन स्पर्धेची पाहणी केली. अतिशय चुरशीच्या सामन्यात इयत्ता १० वी ब च्या संघाने मोठ्या गटात विजेतेपद पटकावले तर उपविजेतेपद ११ वी च्या संघाकडे आले. लहान गटात सहावी च्या संघाने विजेतेपद तर उपविजेतेपद आठवीच्या संघाने पटकावले. पंच म्हणून दीपक पाटील व सलीम तडवी यांनी काम पाहिले. स्कोरर म्हणून आर. ए. घुगे, वाय के भोई, ए ए वानखेडे यांनी काम पाहिले. क्रिकेट सामन्यांचे समालोचन उमेश काटे , शरद पाटील, वाय वाय पाटील यांनी केले. क्रिकेट स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

▶️ सामान्यज्ञान स्पर्धेत 90 विद्यार्थ्यांचा सहभाग
विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व्हावा तसेच भविष्यात स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भावी अधिकारी घडावेत, या उद्देशाने सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात ६ वी ते १२ वी च्या ९० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ए ए वानखेडे व एस ए वाघ यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले.
