वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवार्ड अनंतराव भोसले यांना प्रदान.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांचा दरवर्षी वर्ल्ड कास्टीट्युशन अँन्ड वर्ल्ड पार्लमेंट ( W C P A ) यांच्याकडून सन्मानित केले जाते 2021 या वर्षीचा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम श्रीरामपूर येथील व्हीआयपी गेस्ट हाउस मध्ये दिमाखात पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अधिस्विकृत समिती सदस्य पत्रकार प्रकाश कुलथे हे होते.
याप्रसंगी अनंतराव हिलाल भोसले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव म्हणून वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवार्ड 20 21 यांना हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे सहाय्यक अर्थ सचिव बबनराव माळी यांच्या हस्ते प्रदान करण्यात करून त्यांचा शाल ,पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व अवार्ड देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सेवानिवृत्त रजिस्टर खाते भावराव माळी आणि वर्ल्ड कास्टीट्युशन अँड पार्लमेंट चे महाराष्ट्राचे प्रमुख सन्माननीय डॉ. दत्ता वेघावे व इतर मान्यवर उपस्थित होते या वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री भोसले सर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे