उर्मिला पाटील “महाराष्ट्र भूषण शिक्षक प्रेरणा ” पुरस्काराने सन्मानित!

नाशिक (प्रतिनिधी) निसर्ग मित्र समिती व बोरसे ब्रदर्स धुळे यांच्या कडून दरवर्षी सामाजिक शैक्षणिक व वृक्षारोपण व त्याचे संवर्धन व इतर क्षेत्रात निस्वार्थ सेवा करणाऱ्यांचा विशेष सन्मान केला जातो.
निसर्ग मित्र समिती धुळे व बोरसे ब्रदर्स यांच्याकडून तात्यासाहेब, रू.फ. पाटील शिक्षण मंडळ संचलित अनुदानित आदिवासी आश्रम शाळा बोळेतांडा,ता.पारोळा जि. जळगाव या शाळेतील उपशिक्षिका श्रीमती उर्मिला पाटील यांना “महाराष्ट्र भूषण शिक्षक प्रेरणा ” हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
वरील कार्यक्रमात आमदार जयकुमार रावल व आमदार रोहित पवार व श्री प्रेमकुमार अहिरे निसर्ग मित्र समिती धुळे या संस्थेचे संस्थापक व इतर मान्यवर व सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते श्रीमती उर्मिला पाटील यांना महाराष्ट्र भूषण शिक्षक प्रेरणा हा पुरस्कार देऊन दोघांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम रावसाहेब थोरात सभागृह नाशिक येथे संपन्न झाला
वरील पुरस्कार वितरणाचा कार्यक्रमाचे अध्यक्ष नीलिमा पवार, सरचिटणीस एम व्ही पी संस्था नाशिक यांच्या हस्ते झाला कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डॉ.सुधीर तांबे नाशिक विभागीय पदवीधर मतदार संघ यांनी केले व प्रेरणा गौरव विशेषांक प्रकाशन आमदार किशोर दराडे शिक्षक मतदार संघ,डॉ .तुषार रंधे अध्यक्ष जिल्हा परिषद धुळे, डॉ. तुषार शेवाळे, अतुल निकम यांच्या हस्ते करण्यात आले.
त्याप्रसंगी श्रीमती उर्मिला पाटील म्हणाल्या की या पुरस्काराचे श्रेय आमच्या शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांना दिले.
या पुरस्कार मिळाल्याबद्दल शैक्षणिक संस्थेचे चेअरमन आमदार चिमणराव रूपचंद पाटील व संस्थेचे सचिव अमोल चिमणराव पाटील तसेच सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आप्तेष्ट व मित्रमंडळी यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.