पिंपळे बु.गावातील आवश्यक ती सर्व विकासकामे मार्गी लावणार-आ.अनिल पाटील

अमळनेर (प्रतिनिधी) पिंपळे बु.-येथे आ.अनिल पाटलांच्या प्रयत्नाने 15 लक्ष निधीतून मंजूर झालेल्या सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन नुकतेच आ.अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
2515 योजनेतून हे काम मंजूर झाले आहे.यावेळी आमदारांचे उस्फूर्त असे स्वागत ग्रामस्थांनी केले,यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले की कोरोनामुळे सुमारे दीड ते दोन वर्षे निधीअभावी काही विकासकामे रखडली असली तरी आता निधीचा वेग वाढवून बॅकलॉग भरून काढण्याचे काम सुरू आहे,यास सर्वांच्या आशीर्वादाने यश देखील मिळत आहे,या गावाने मला विशेष प्रेम दिले असल्याने येणाऱ्या काळात आवश्यक ती सर्व विकासकामे मार्गी लावली जातील अशी ग्वाही आमदार पाटील यांनी दिली.यावेळी शेतकी संघाचे मुख्य प्रशासक संजय पुनाजी पाटील,सरपंच सौ इंदुबाई भिमराव पाटील,माजी सरपंच योगेश अशोक पाटील,पोलीस पाटील दिलीप साहेबराव पाटील,ग्रा प सदस्य देविदास प्रताप चव्हाण,विकासो चेअरमन अशोक चुडामण पाटील, महेंद्र संतोष पाटील , विश्वास संपत पाटील, राहुल शालिक पाटील,निंबा रूपसिंग पाटील, दिलीप नामदेव बैसाणे ,युवराज श्रीराम सैदाणे, प्रकाश पंडित पाटील, डिगंबर दौलत चौधरी ,ज्ञानेश्वर पाटील, ऋषिकेश पाटील , जिवन पाटील उपस्थित होते.सूत्रसंचालन युवराज सोनवणे यांनी केले.कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

