लोकनेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 10 रोजी भव्य दंत चिकित्सा शिबिर

▶️ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चा उपक्रम
अमळनेर (प्रतिनिधी) १२ डिसेंबर रोजी लोकनेते खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन १० डिसेंबर रोजी दुपारी १२ ते ४ च्या दरम्यान साने गुरुजी विद्यालयातील एस.एम.गोरे सभागृहात करण्यात आले आहे.
या शिबिराचे उदघाटन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते होणार असून माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिबिराचे आयोजन केले आहे. यावेळी सनी मानकर प्रदेश प्रभारी रा.वि.काँग्रेस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तसेच, जि.प.सदस्या जयश्री पाटील, बाजार समितीच्या मुख्य प्रशासक सौ.तिलोत्तमा पाटील, संदीप घोरपडे, रा.कॉ.तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, कार्याध्यक्ष सुरेश पाटील, विनोद कदम, जिल्हा नियोजन समिती सदस्य भागवत पाटील, शेतकी संघाचे मुख्य प्रशासक संजय पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती असेल. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीनाथ रविंद पाटील तसेच शहराध्यक्ष सुनील रजनी शिंपी यांनी केले आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे तालुका व शहर पदाधिकारी शिबीरासाठी मेहनत घेत आहेत.