सुप्रसिद्ध वक्ते शिवश्री गंगाधर बनबरे यांचे आज व्याख्यान

अमळनेर (प्रतिनिधी) क्रांतिसूर्य जोतीराव फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिन व तालुक्यातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्मृतिशेष शांताराम पाटील यांच्या स्मरणार्थ प्रबोधन व्याख्यांनमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेत सुप्रसिद्ध विचारवंत, लेखक व वक्ते शिवश्री गंगाधर बनबरे (पुणे) यांचे “विचार परिवर्तन केल्याशिवाय समाज परिवर्तन शक्य नाही” या मूलभूत विषयावर व्याख्यान उद्या (ता ११) येथील जी एस हायस्कूलच्या आय एम ए हॉल मध्ये सायंकाळी पाचला होणार आहे. राष्ट्रीय ओ बी सी संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धनदाई माता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. डी.डी.पाटील हे कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी असतील. समाजाच्या वैचारिक परिवर्तन चळवळीत योगदान देण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत युवा कल्याण प्रतिष्ठाण यांचेसह नागरी हित दक्षता समिती,मराठा सेवा संघ,राष्ट्र सेवा दल,राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठान, समता परिषद,युथ सेवा फाऊंडेशन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद,प्रोटॉन शिक्षक संघटना , भारत मुक्ती मोर्चा,व्यवस्था परिवर्तन मंच,शिव बहुद्देशिय प्रतिष्ठान आदि संघटनांचे पदाधिकारी यांनी केले आहे.