शेतकी संघाच्या माध्यमातून आमदारांचा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग

▶️ मराठासह,राजपूत,धनगर,माळी,गुजर व मुस्लिम समाजास दिले प्रतिनिधित्व
▶️ शेतकरी हितासाठीच नेमले कार्यकर्त्यांचे प्रशासक मंडळ-आ.अनिल पाटील
अमळनेर (प्रतिनिधी) मतदारसंघाचे भूमिपुत्र म्हणून विधानसभा गाठणाऱ्या आमदार अनिल पाटील यांनी सर्व जाती धर्माना सोबत घेत सोशल इंजिनिअरिंग चा प्रयोग आपल्या मतदारसंघात सुरू केला असून या प्रयोगाचा पहिला टप्पा त्यांनी अमळनेर शेतकरी सहकारी संघात अशासकीय प्रशासक मंडळ नेमताना यशस्वी करून दाखविला आहे,या संघात मराठा समाजासह राजपूत,धनगर,माळी,गुजर आणि मुस्लिम आदी समाजाच्या प्रतिनिधींची मोट बांधत 13 सदस्यीय मंडळ शेतकी संघात विराजमान केले आहे.
या प्रशासक मंडळाचा पद्ग्रहण सोहळा दि 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आयोजित करण्यात आला,या सोहळ्यात प.पू बालकनाथ महाराज उर्फ दिनेश काटे यांची विशेष उपस्थिती होती तर सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आमदार अनिल पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेसचे जेष्ठ नेते भैय्यासाहेब रामभाऊ पाटील, जि प सदस्या सौ जयश्री अनिल पाटील,बाजार समितीच्या मुख्य प्रशासक सौ तिलोत्तमा पाटील,काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ सुलोचना वाघ,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील,सेनेचे तालुका प्रमुख विजय पाटील,राष्ट्रवादी ग्रंथालय सेलच्या प्रदेश समन्वयक सौ रिता बाविस्कर,खा शी मंडळाचे संचालक हरी भिका वाणी आदींची होती.यावेळी मान्यवरांच्या हस्ते शेतकी संघाचे दिवंगत अध्यक्ष स्व.हरी निंबाजी पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले,यानंतर आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते सर्व प्रशासक मंडळ सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना आ अनिल पाटील म्हणाले की शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवूनच बाजार समिती व शेतकी संघात शासकीय प्रशासक ऐवजी शेतकरी पुत्रांचे अशासकीय प्रशासक मंडळ विराजमान केले आहे,कदाचित शासकीय प्रशासक असते तर आपण अडचणी मांडू शकलो नसतो,तालुक्यात शेतकरी संघ आणि फ्रुटसेल या दोन्ही संस्था एकेकाळी तालुक्याचे भूषण व वैभव होत्या, तालुक्यातील प्रत्येक वडीलधाऱ्या शेतकऱ्यांनी ते वैभव अनुभवले आहे,निवडणुकी अभावी साडेचार वर्षापासून येथील कामकाज थांबले आहे,खरेदीत शिस्त लावण्यासाठी हे मंडळ आवश्यक होते,या प्रशासक मंडळाने खरेदी प्रक्रियेत प्रदर्शकता आणल्यास जनतेची विश्वासार्हता नक्कीच वाढेल,राजकीय व सामाजिक समतोल हे मंडळ निवडताना राखण्याचा प्रयत्न केला आहे,यात काहींना डावलले गेल्याची भावना साहजिक होऊ शकते परंतु कोणत्याही कार्यकर्त्यांना डावलणे हा नेत्यांचा हेतू कधीच नसतो हे लक्षात घ्यावे,जे कार्यकर्ते निवडणूक प्रक्रियेतून येऊ शकत नाहीत त्यांना यापध्दतीने संधी देता येते मात्र जे निवडणूक लढऊ शकतात त्यांना या मार्गाची आवश्यकता नाही हे त्यांनी लक्षात घ्यावे,प्रत्येकाला कुठेनकुठं संधी मिळत असते,खरेतर जनतेने मला आमदार केले म्हणून हे सारे मी करू शकत आहे,शेतकी संघाचे हरपलेलं वैभव प्राप्त करण्याची जवाबदारी आता या प्रशासक मंडळावर आली आहे, आपल्या व्यक्तीच्या आमदारकी मुळे घडत असलेला बदल जनतेच्या डोळ्यासमोर आहे,या मंडळाच्या माध्यमातून शेतकी संघ लवकरच बहरलेला दिसेल असे सांगत जे सभासद आता 31 मार्च पर्यंतच पात्र असतील त्यांनी रिन्युअल करणे आवश्यक असल्याने या मंडळाने त्या सभासदांकडून रिन्युअल करून घ्यावे असे आवाहन आमदारांनी केले.शेतकी संघावर कोणताही अतिरिक्त बोजा लादू नये अश्या सूचना देखील आमदारांनी प्रशासक मंडळास केली.
माजी आ कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी शेतकरी बांधवानीच पलटी मारली म्हणून शेतीचे दिवसही पालटले आहेत,उत्तम शेती ही म्हणच आपण विसरत चाललो आहोत अशी खंत व्यक्त करून आमदार अनिल पाटील यांनी चांगले धोरण ठेवत बाजार समिती आणि शेतकी संघात चांगली मंडळी प्रशासकाच्या रूपाने दिली असल्याने नक्कीच भरभराट होईल असा आशावाद व्यक्त केला,व शेतकी संघात विकासात्मक बदल घडावा अशी अपेक्षा व्यक्त केली.जेष्ठ नेते भैय्यासाहेब पाटील यांनी जुन्या कार्यकर्त्यांचे दर्शन घेण्यासाठी मी आवर्जून आल्याचे सांगत,शेतकऱ्यांसाठी या संस्थांची खूप गरज आहे,आधीच निसर्ग साथ देत नाही त्यामुळे या संस्थेच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ घेता येत असतो,अनेक संकटांमुळे शेती कशी करावी हा प्रश्न असल्याने शेतकऱ्यांना विद्यमान नेत्यानी प्रोत्साहन द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.मार्केटच्या मुख्य सचिव सौ तिलोत्तमा पाटील यांनी अनिलंदादा नावाचे आमदारकीचे झाड आपल्या तालुक्यातील जनतेने एकत्र होऊन लावले म्हणूनच संस्था आणि कार्यकर्तेही जिवंत होत आहेत,शेतकी संघ एकेकाळी गजबजत होता,ये गतवैभव प्राप्त करण्यासाठी हरी आण्णाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन विद्यमान प्रशासक मंडळाने भरभराटीसाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

▶️ सर्व समाजाला सोबत घेणारे आदर्श आमदार-संजय पाटील
सुरवातीला प्रास्तविक करताना प्रास्तविक संजय पाटील म्हणाले की आमदारांच्या सूचनेनुसारच महानिर्वाण दिनीच हा सोहळा आयोजित केला आहे,स्व हरी अण्णांकडून मी बाळकडू घेतले असल्याने,पुढील काळात ही संस्था नक्कीच आर्थिक भरभराटीस आणण्याचा प्रयत्न करू,या संघात सर्व समाजाला सोबत घेण्याची पूर्वीच्या जेष्ठ नेत्यांची जी परंपरा होती तीच आमदार अनिल पाटील यांनी देखील जोपासली,येथे लहान असलेल्या मुस्लिम समाजाच्या ग्रामिण कार्यकर्त्याला देखील त्यांनी पण दिला,याशिवाय राजपूत,माळी, मुस्लिम,धनगर,गुजर व मराठा तसेच देशासाठी पोलीस सेवेत चांगले योगदान देणारे मंगलसिंग सूर्यवंशी यांच्यासारख्या व्यक्तिमत्वास देखील त्यांनी स्थान दिले,अतिशय चांगली भावना त्यांची असून भविष्यात निवडणुकीस ही संस्था कशी प्राप्त होईल त्यासाठीच आमदारांनी हे प्रशासक मंडळ नेमले आहे,हा विश्वास नक्कीच सार्थकी लावू अशी ग्वाही देत,या प्रक्रियेसाठी राज्याचे सहकार मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राज्य ग्रंथालय समितीच्या अशासकीय सदस्यपदी सौ रिता बाविस्कर यांची नियुक्ती झाल्याने यांच्यासह आदर्श शिक्षिका सौ योजना पाटील,गौरव पुरस्काराबद्दल प्रा मंदाकिनी भामरे,शेतकी संघाचे व्यवस्थापक संजय पाटील व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सभापती श्याम अहिरे,राष्ट्रवादी शहराध्यक्ष मुक्तार खाटीक,प्रकाशचंद्र पारेख,मार्केटचे प्रशासक प्रा सुरेश पाटील,सौ कविता पवार,सौ वसुंधरा लांडगे,अँड तिलोत्तमा पाटील,माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी,राजू फाफॊरेकर , शिवाजीराव पाटील, शांताराम बापू, शिवाजी गोसावी,शेखा मिस्तरी,बन्सीलाल भागवत,आशा चावरीया नरेंद्र संदानशीव यासह महाविकास आघाडीतील काँगेस, राष्ट्रवादी व सेनेचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,या सोहळ्याच्या निमित्ताने अनेक वर्षानंतर प्रथमच शेतकी संघाचा परिसर गर्दीने फुलला होता,सूत्रसंचालन संजय पाटील यांनी व आभार महेश देशमुख यांनी मानले.
▶️ यांचे झाले पद्ग्रहण
संजय पुनाजी पाटील (मुख्य प्रशासक), व सर्वश्री प्रशासक म्हणून माजी नगरसेवक भाईदास महाजन , भरत धनसिंग पाटील(खोकरपाट), रवींद्र कौतिक पाटील(जानवे), उमाकांत दिनकर पाटील(मारवड), धनराज पितांबर पवार (रुंधाटी), संजय भिला पाटील (पैलाड), सुधाकर यशवंत धनगर(करणखेडा), बाजार समितीचे माजी संचालक सुरेश पिरन पाटील(निंभोरा), अलीम हकीम मुजावर (धार), खान्देश शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष महेश देशमुख (गांधली), ज्ञानेश्वर गंगाराम पाटील(पैलाड), माजी अप्पर पोलीस अधीक्षक मंगलसिंग बळीराम सूर्यवंशी(कलाली) यांचे यावेळी पद्ग्रहण झाले.