डॉ.उस्मान पटेल यांना राष्ट्रीय यशवंत रत्न पुरस्कार प्रदान

पारोळा (प्रतिनिधी) येथील गजानन विद्या मंदिर या शाळेतील आदर्श शिक्षक डॉ.उस्मान फकीरा पटेल यांना राष्ट्रीय यशवंत रत्न पुरस्कार बहाल करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे मा. अध्यक्ष अरुणभाई गुजराथी., प्रमुख पाहुणे अहिल्याबाई होळकर चे वंशज भूषणसिंह राजे होळकर., मा . आमदार राजूमामा भोळे,संस्थापक अध्यक्ष संगीता पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आला. आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत बस ची पास, शैक्षणिक साहित्याचे वाटप, शैक्षणिक गुणवत्तेचे बरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकास करण्याचे काम डॉ.पटेल सर हे सातत्याने करत आहे, म्हणून त्यांना यशवंत रत्न या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. सामाजिक पर्यावरण, क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली आहे. यापूर्वीही त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कारामुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे.