सावधान! पुणे,पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रॉनचे 7 रुग्ण!

0

पुणे (वृत्तसंस्था )महाराष्ट्रावरील ‘ओमायक्रॉन’चे संकट आणखी गडद होताना दिसत आहे . डोंबिवलीतील तरुणाला ‘ ओमायक्रॉन’ची बाधा झाल्याचे शनिवारी ( 4 डिसेंबर ) समोर आले होते . त्यानंतर आज आणखी 7 रुग्णांची त्यात भर पडली आहे . त्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे .. विशेष म्हणजे , एकट्या पिंपरी – चिंचवडमध्ये ‘ ओमायक्रॉन’चे 6 , तर पुण्यात 1 रुग्ण आढळला आहे . त्यामुळे महाराष्ट्रातील ‘ ओमायक्रॉन ‘ व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या आता 8 वर गेली आहे .
▶️ भावंडांची भेट पडली महागात

नायजेरियातील लेगॉस शहरातून आपल्या भावाला भेटण्यासाठी 44 वर्षीय महिला 24 नोव्हेंबर रोजी पिंपरी – चिंचवडला आली होती . तिच्यासोबत आलेल्या तिच्या दोन मुली , पिंपरी – चिंचवडमध्ये राहणारा तिचा भाऊ नि त्याच्या दोन मुली , अशा एकूण 6 जणांना ‘ ओमायक्रॉन ‘ विषाणूची लागण झाली आहे . नायजेरियाची नागरिक असणारी भारतीय वंशाची महिला तिच्या 12 व 18 वर्षांच्या मुलींसह भावाला भेटण्यासाठी पिंपरी चिंचवडला आली होती . चाचणीत या तिघींनाही ‘ ओमायक्रॉन’ची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते.
दरम्यान , नंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या 13 निकटवर्तीयांची चाचणी केली असता , त्यात महिलेचा भाऊ , त्याची दीड व 7 वर्षांच्या मुलीलाही ‘ ओमायक्रॉन ची लागण झाल्याचे समोर आले . या सर्वांवर जिजामाता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून , सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे .
▶️ पुण्यातही एक रुग्ण!
दरम्यान , पुणे शहरात आढळलेल्या 47 वर्षीय रुग्ण 18 ते 25 नोव्हेंबर दरम्यान फिनलँड येथे गेला होता . 29 तारखेला त्याला ताप आला . चाचणीत त्यालाही या नवीन व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झालेय . त्याने कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली .

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!