महाराष्ट्रात प्रवेशासाठी नवी नियमावली;कडक निर्बंध लागू!

मुंबई (वृत्तसंस्था) परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या लाेकांसाठी मोठी बातमी आहे.. कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ या नव्या विषाणूमुळे ठाकरे सरकार सतर्क झाले आहे. परराज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केलीय..
आता महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे बंधनकारक करण्यात आले आहेत. जर लसीचे दोन्ही डोस घेतलेले नसतील, तर कोविडची ‘आरटीपीसीआर’ चाचणी केलेली असावी. चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवावा लागेल. त्याशिवाय महाराष्ट्रात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.
▶️ रस्त्यावर पोलिसांचे चेकपोस्ट
कर्नाटकमधून कोल्हापूरमार्गे महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.. रस्त्यावर पोलिसांच्या चेकपोस्ट उभारण्यात आल्या आहेत. शिवाय अन्य ठिकाणीही अशाच प्रकारची दक्षता घेण्यात येत असल्याचे पाहायला मिळते..
दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळून आल्यानंतर केंद्राने राज्य सरकारांना विशेष सूचना केल्या आहेत. त्यानुसार ठाकरे सरकारने नुकतीच नवी नियमावली जाहीर केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी कडक निर्बध घातले आहेत.