प्रा. लिलाधर पाटील जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

अमळनेर (प्रतिनिधी) शिक्षणमहर्षी पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेतर्फे महात्मा फुले स्मृतिदिना निमित्त प्रा. लिलाधर पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन जळगाव येथे आयोजित उत्तर महाराष्ट्र राज्यस्तरिय पुरस्कार सोहळ्यात नुकतेच सन्मानित करण्यात आले.
सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात पंधरा वर्षांपासून वाणी आणि लेखणीच्या माध्यमातून त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे शिक्षक परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रेमचंद आहिरराव यांनी याप्रसंगी सांगितले. जळगावचे शिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रा.लिलाधर पाटील यांना प्रदान करण्यात आला. यावेळी शिक्षक परिषदेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रभाकर झोड, जळगावचे तुरुंगाधिकारी जितेंद्र माळी हे प्रमुख अतिथी म्हणून तर अध्यक्ष म्हणून नूतन मराठा विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष हेमांतकुमार साळुंखे हे उपस्थित होते.
प्रा लिलाधर पाटील यांना मिळालेल्या गौरव पुरस्काराबद्दल धनदाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पवार, एन.मूकटो. प्राध्यापक संघटनेच्या स्थानिक शाखेचे अध्यक्ष प्रा. किशोर पाटील व सर्व पदाधिकारी यांनी प्रा. पाटील यांचा धनदाई महाविद्यालयात सत्कार केला तर संस्थेचे अध्यक्ष डी.डी. पाटील, उपाध्यक्ष प्रा. के.डी. पाटील, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे,नागरी हित दक्षता समितीचे प्रा अशोक पवार, पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी यांचेसह समाजाच्या विविध स्तरातून मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.