ओबीसी सेलच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी प्रा.डी.डी.पाटील

अमळेनर (प्रतिनिधी) येथील धनदाईमाता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा डी.डी पाटील यांची ओबीसी सेल च्या जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, मार्गदर्शक राहुल गांधी , प्रियंका गांधी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा गृहमंत्री ताम्रध्वजजी साहू ( छत्तीसगड ) यांच्या मान्यतेने व प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशाने पक्ष संघटनेतील उल्लेखनीय कार्य पाहुन प्रा.डी डी पाटील यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रा.के डी पाटील, धनदाई कॉलेजचे प्राचार्य डॉ प्रमोद पवार, नंदकुमार पाटील, शिवशाही फाऊंडेशन चे अध्यक्ष तथा प्रजाराज्य न्यूजचे मुख्य संपादक जयेशकुमार काटे, शिवशाही फाऊंडेशनचे सचिव तथा दैनिक सकाळ चे पत्रकार उमेश काटे यांच्या सह सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेकांनी अभिनंदन केले आहे.