अखेर 1 डिसेंबरपासून पहिली पासून सर्व वर्ग ऑफलाइन सुरु!

0

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात 1 डिसेंबरपासून पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग ऑफलाइन सुरु करण्यास ठाकरे सरकारने मंजुरी दिली आहे . ग्रामीण भागात पहिली ते चौथी , तर शहरी भागातील पहिली ते सातवीच्या शाळा येत्या 1 डिसेंबरपासून सुरु होणार आहेत . दरम्यान , आपल्या पाल्यांना शाळेत पाठवायचे की नाही , याचा निर्णय तूर्त ऐच्छिक असेल . विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याची सक्ती केली जाणार नाही . कोविड -19 बाबत खबरदारीचे उपाय व ‘ एसओपी ‘ लवकरच जारी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले . राज्याच्या कोविड टाक्स फोर्सनेही पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरु करण्यास परवानगी दिली होती . तसेच गेल्या काही दिवसांपासून पालकही आता शाळा सुरु करण्याची मागणी करीत होते . त्यानुसार राज्य मंत्रीमंडळाच्या आजच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.
दरम्यान , याआधी पाचवीपासूनचे वर्ग सुरु केले होते . आता पहिली ते चौथीचे वर्गही सुरु होणार असल्याने आता राज्यातील सरसकट शाळा सुरु होणार आहेत . पहिली ते चौथीच्या वर्गातील मुले लहान असल्याने त्यांच्या सुरक्षेबाबतची काळजी प्रामुख्याने शाळांनी घ्यायची आहे . शिक्षक , मुख्याध्यापक नि शालेय प्रशासनाला याबाबतचे आदेश दिले जाणार आहेत . यासंदर्भात आवश्यक नियमावली लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले . याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या , की ” ग्रामीण भागात 5 वी ते 12 वी , तर शहरी भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु झालेले आहेत . आता ग्रामीण भागात पहिली ते चौथी , तसेच शहरी भागात पहिली ते सातवीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्या म्हणाल्या की, “ पहिलीतील मूले अद्याप शाळेतच आलेली नाहीत . त्यामुळे त्यांच्या पालकांशी संवाद साधण्यात येईल . सर्व मुलांसाठी सुरक्षित , आरोग्यदायी वातावरण तयार करण्यात येईल. ”

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!