राज्यात 4-5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता!

पुणे (वृत्तसंस्था) अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात अनेक ठिकाणी चार ते पाच दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे असे पुणे वेधशाळेने सांगितले आहे.
▶️ अशी असणार पुढील स्थिती ?
▶️ 18 नोव्हेंबरला – ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदगर, नाशिक, धुळे आणि नंदूरबार या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे
▶️ 19 नोव्हेंबरला – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे
▶️ 20 नोव्हेंबरला – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, लातूर, नंदुरबार आणि नांदेड जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे
▶️ 21 नोव्हेंबरला – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.