दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परत मिळणार परीक्षा शुल्क!

0

पुणे (वृत्तसंस्था) उच्च न्यायालय (मुंबई) यांच्या आदेशानुसार मंडळाने सन २०२१ मधील माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (१० वी ) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा ( १२ वी ) चे परीक्षेकरिता नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काच्या रकमेचा परतावा अंशतः करण्यात येत असल्याचे प्रकटन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (पुणे)चे सचिव डॉ अशोक भोसले यांनी आज प्रसिद्धीस दिले.

कोविड -१९ च्या प्रादुर्भावामूळे शासनाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (पुणे) मार्फत सन २०२१ मधील १० वी व १२ वी च्या मुख्य परीक्षा रद्द केल्या होत्या. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंडळाने सन २०२१ मधील १० वी व १२ वी चे परीक्षेकरिता नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काच्या रकमेचा परतावा अंशतः करण्यात येणार आहे. यासाठी माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी विद्यार्थ्यांचा तपशील उद्या (ता. १२) सकाळी ११ वाजे पासून मंडळाचे १० वी व १२ वी साठी mahahsscboard.in तसेच १० वी साठी https://feerefund.mh-ssc.ac.in तसेच १२ वी साठी https://feerefund.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावरून अथवा लिंकव्दारे नोंदविणे आवश्यक आहे. याची सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंद घ्यावी, असे आवाहन डॉ भोसले यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!