अमळनेरात मौर्य क्रांती संघातर्फे परिवर्तन यात्रेचे स्वागत!

अमळनेर (प्रतिनिधी) साने गुरुजी विद्यालयात मौर्य क्रांति संघ, राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठान व अमळनेर तालुका धनगर समाजातर्फे सभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला व्यासपीठावरील मान्यवरांचे शाल व बुके देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पीएसआय हिरामण कंखरे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मौर्य क्रांती संघाचे प्रदेश सदस्य व राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष बन्सीलाल भागवत यांनी केले. परिवर्तन यात्रेचे नेतृत्व करणारे मौर्य क्रांती संघाचे महासचिव प्रताप पाटील यांनी आपल्या भाषणातून धनगर समाजाचा गौरवशाली इतिहास,मौर्य क्रांती संघाचे ध्येय धोरण व उद्देश समाजव्यवस्था परिवर्तन व 21 नोव्हेंबर जेजुरी येथे होणाऱ्या तिसरी धनगर जागृती परिषदेला येण्याचे आव्हान त्यांनी केले. तसेच परिवर्तन यात्रेचे सहनेतृत्व करणारे मौर्य क्रांती संघाचे पश्चिम विभागीय अध्यक्ष सत्यवान दुधाळ साहेब यांनी मौर्य क्रांति संघाची भूमिका व उद्देश,मौर्य क्रांती संघाचे ज्वलंत विचार मांडले.छात्रभारती चे मा अध्यक्ष व नागरी हित समितीचे अध्यक्ष प्रा.अशोक पवार व साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ चे सचिव माननीय संदीप घोरपडे यांनीसुद्धा यावेळी विचार मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस सी तेले यांनी केले व आभार मौर्य क्रांति संघाचे तालुकाध्यक्ष गोपीचंद शिरसाठ यांनी केले. या कार्यक्रमाला अरुणाताई पाटील,कोमल दुधाळ, गटशिक्षणाधिकारी अशोक बि-हाडे साहेब,मगन भाऊसाहेब पाटील,विश्वास पाटील,रियाज शेख, रज्जाक शेख,मौर्य क्रांती संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र लाळगे,जिल्हा उपाध्यक्ष रमेश देव शिरसाठ,मा.उपसरपंच समाधान धनगर,धानोरा सरपंच दिलीप ठाकरे,प्राध्यापक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष,प्रा.विजय शिरसाठ, भाजपाचे मा.शहराध्यक्ष हरचंद लांडगे, युवा मल्हार सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख देवा लांडगे,ए के धनगर,प्रा.आर पी धनगर, प्रा.जगदीश भागवत,प्रा.मनोज रत्नपारखी,पंकज धनगर, तुषार इधे,आनंदा बच्छाव सर,सेवानिवृत्त इंजिनीयर श्रीराम कंखरे,कवी रमेश पवार, प्रा.लक्ष्मण निळे,सेवानिवृत्त पी.एस आय आत्माराम कंखरे, भरत निळे,शांताराम ठाकरे,सुमित्र अहिरे, जितेन संदांशिव,उमेश मनोरे,डी ए धनगर,जयप्रकाश लांडगे,कैलास ठाकरे,मुरलीधर पाटील,विजय धनगर,नाना पाटील,मंगला पाटील,छाया सोनवणे,योगेश भागवत,समाधान भागवत,कल्प ना शिरसाठ,मिनाबाई शिरसाठ अरुण ठाकरे,नाना शिरसाठ,आधार धनगर,कैलास धनगर,राजेंद्र सोनवणे,
व समाज बांधव उपस्थित होते.
