उपक्रमशील गणित विज्ञान शिक्षक निरंजन पेंढारे 10 रोजी आकाशवाणीवर!

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील वावडे येशील श्री बी बी ठाकरे हायस्कूलचे उपक्रमशील शिक्षक निरंजन पेंढारे यांची उद्या 10 नोव्हेंबर, बुधवार रोजी आकाशवाणी जळगाव केंद्रावर रात्री 9 वाजता लोकजागर ह्या लोकप्रिय कार्यक्रमात विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. जेष्ठ व तज्ज्ञ मुलाखतकार अनिरुद्ध कांबळे सर यांनी ही मुलाखत घेतली आहे.
आकाशवाणी वर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना मुलाखतीसाठी निमंत्रण करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून शिक्षक गटामधून जिल्ह्यातील गणित व विज्ञान विषयात उल्लेखनीय कार्य केलेले निरंजन पेंढारे यांना बोलावण्यात आले. त्यांनी आतापर्यंत जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवर विज्ञान विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून अनेकदा काम सांभाळले असून विज्ञान विषयातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रशिक्षण सुद्धा घेतलेली आहेत. त्यांच्या शाळेत नुकतेच संपूर्ण भारतातुन केवळ 50 शाळांमधून सुरू होत असलेले डॉ. कलाम चाईल्ड सायंटिस्ट सेन्टर सुद्धा सुरू होत आहे. निरंजन पेंढारे यांनी आपल्या विद्यालयात स्वनिर्मित गणित प्रयोगशाळा सुद्धा स्थापन केली असून वावडे, जवखेडे सह परिसरातील विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा लाभ ते मिळवून देत असतात. अमळनेर तालुका विज्ञान समन्वयक म्हणून काम करतांना ते विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही उत्कृष्ट कार्य करीत आहेत. सदर कार्यक्रम ऐकण्यासाठी आपल्या कडे जर रेडिओ उपलब्ध नसेल तर मोबाइल मध्ये लाईव्ह रेडिओ म्हणून अँप डाउनलोड करून आपण कार्यक्रमाचा लाभ घेऊ शकतात .