एस टी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाला मनसेचा जाहीर पाठिंबा!

अमळनेर (प्रतिनिधी) येथील एस टी कर्मचारी हे आगार परिसरात आपल्या प्रमुख मागण्यासाठी बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहेत. कर्मचाऱ्यांच्या या मागण्या रास्त असल्याने येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. या मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्यक्ष आंदोलनात मनसे स्टाईलने सहभागी होणार असल्याचा इशारा ही देण्यात आला आहे.
यावेळी पाठिंब्याचे पत्र पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. ‘मनसे’ चे जिल्हा अध्यक्ष मुकुंदाभाऊ रोटे, तालुका अध्यक्ष अधिकार पाटील, मनसे सैनिक संदीप पाटील, माजी जिल्हाप्रमुख सुनील भामरे, विद्यार्थी सेनेचे सुमित पाटील, जितेंद्र बिऱ्हाडे, सचिन भालेराव, तेजस कोळी, बाबा ग्रुपचे अध्यक्ष धनु भाऊ सोलंखे, अरुण गव्हाणे आदी उपस्थित होते. शासनात विलीनीकरण करा, वार्षिक वेतन वाढीचा दर २ टक्के वरून ३ टक्के करावा, महागाई भत्ता २८ टक्के प्रमाणेच मिळावा, घर भाडे राज्य शासनाप्रमाणे ८/१६/२४ दराप्रमाणे च मिळावा, कामगार करारा प्रमाणे सर्व कामगारांना नियमित वेतन मिळायला पाहिजे, दिवाळी बोनस १५हजार रु मिळावा, सण उचल १२ हजार५०० रुपयांप्रमाणे मिळावा, या सर्व प्रमुख मागण्या मान्य न झाल्यास मनसे आपल्या स्टाईलने आंदोलनात सहभागी होणार आहे.
