अमळनेरला 7 नोव्हेंबर रोजी कर्तृत्वाचा महासन्मान!

अमळनेर (प्रतिनिधी) उत्कर्ष खान्देशी अधिकारी व तालुक्यातील विविध विकास मंच तर्फे “कर्तृत्वाचा महासन्मान” हा कार्यक्रम येत्या रविवारी (ता.७) येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात सकाळी साडे नऊला होणार आहे. यात यूपीएससी परीक्षेत १८२ रँक मिळविणारे गौरव साळुंखे, ४८४ रँक मिळविणाऱ्या वृष्टी जैन व एमपीएससी परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम आलेल्या उपजिल्हाधिकारी मानसी पाटील यांच्यासह त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जेष्ठ विधीतज्ञ तथा पद्मश्री अॅड . उज्ज्वल निकम, पिंपरी- चिंचवड मनपाचे आयुक्त राजेश पाटील, आयकर विभागाचे सह आयुक्त संदीपकुमार साळुंखे (पुणे) यांच्या हस्ते सत्कार होणार असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. आमदार अनिल पाटील, नगराध्यक्षा पुष्पलताताई पाटील, माजी आमदार डॉ . बी . एस पाटील, माजी आमदार कृषीभुषण साहेबराव पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार स्मिताताई वाघ आदींची विशेष उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन उत्कर्ष खान्देशी अधिकारी मंडळ, शिवशाही फाऊंडेशन, प्रताप तत्वज्ञान केंद्र, साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्र व तालुक्यातील विविध विकास मंचतर्फे जळगाव मनपाचे वित्त व लेखाधिकारी कपिल पवार यांनी केले आहे.
