आशाकिरण मंच व धनदिप बहुउद्देशीय संस्थेकडून फराळ वाटप

अमळनेर (प्रतिनिधी) आशाकिरण मंच व धनदिप बहुउद्देशीय संस्था यांच्या कडून गोरगरीबांसाठी फराळ वाटप छाया अशोक इसे व यमुना ताई अवकाळे यांच्या संकल्पनेने गरिबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी मंचच्या सर्व सदस्यांनी पैसा एकत्र करून शेवचिवडा,फरसाण,शंकरपाळी,बालीशाही इत्यादी फराळाच्या पदार्थांचे किट तयार करून 130 जानवे व मंगरूळ येथील गरजू कुटुंबांना वाटप केले यासाठी मंच सदस्य डी ए धनगर, छाया इसे,अशोक इसे, भारती पाटील,स्वाती पाटिल,सरिता जाधव यांनी विशेष मेहनत घेतली तसेच फराळ वाटप करण्यासाठी धनगर सर, दत्ता सोनवणे,मनोहर नेरकर,प्रकाश पाटील,प्रविण पाटील,अशोक इसे,छाया इसे, सरिता जाधव,सुनेत्रा भांडारकर,नुतन पाटील यांचे सहकार्य लाभले.