चिमुकल्यांनी साजरी केली;दीपावली कृतज्ञतेची!

जळगाव (प्रतिनिधी) भारत देशाला स्वातंत्र्य मिळुन ७४ वर्षे पुर्ण झाली, भारतीय स्वातंत्र्याचे ७५ व्या वर्षात पदार्पण झाले असुन यंदाची हीअमृत महोत्सवी दीपावली साजरी करण्यासाठी जळगाव शहरातील अभिनव प्राथमिक विद्यालय सराव पाठ शाळेतील इ.३ री च्या विद्यार्थ्यांनी वर्गांतर्गत राबविण्यात आलेल्या “दीपावली कृतज्ञतेची “ या उपक्रमात अतिशय उत्साहाने सहभाग घेतला. दीपावली कृतज्ञतेची या उपक्रमा ची संकल्पना त्यांच्या वर्ग शिक्षिका स्नेहल प्रकाश ठाकूर यांच्या कल्पनेतुन साकारली असल्याचे स्नेहल ठाकूर यांनी सांगितले. विद्यार्थ्यां प्रती समाजासाठी असलेली कृतज्ञता वेळोवेळी दर्शवण्यात आली तरच विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची रुजवण करण्यास आपण नक्कीच हातभार लावू शकतो असंही त्या बोलताना म्हणाल्या. आपण आपल्या ज्या समाजात राहतो त्यांचं काहीतरी देणे लागतो ही परोपकाराची भावना प्रत्येकामध्ये रुजवण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या पाचही दिवसात अनुक्रमे
▶️ प्रतीक्षा द्विवेदी -एक दिवा शहीदांसाठी
▶️ लोकेश माळी -एक दिवा योध्दांसाठी
▶️ नंदिनी परदेशी-एक दिवा भूमिपुत्रांसाठी
▶️ दिशा मराठे- एक दिवा निसर्ग देवांसाठी
▶️ संकल्प पहाडे -एक दिवा स्वच्छता दुतांसाठी
याप्रमाणे दिवे लावून आपल्या प्रती असलेली कृतज्ञता विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्याचे दिसून येते. तसेच विद्यार्थ्यांकडुन दिवाळीसाठी कागद कामातून कंदील, पणत्या आणि फटाके बनवून एक विशेष दिवाळी उपक्रम सुद्धा ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात आला.
या अतिशय स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शिक्षण मंदिर संस्थेचे अध्यक्ष एस.डी. चौधरी,अध्यापिका विद्यालयाच्या प्राचार्या. चौधरी मॅडम तसेच अभिनव विद्यालयाचे मुख्याध्यापक नेमाडे सर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले.
