अमळनेरचे रहिवासी प्रा.शशिकांत पाटील लिन्क्ड इन बेस्ट प्रोफाईलचे विजेते

अमळनेर (प्रतिनिधी) पंजाबमधील जालंधर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था ( नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ) या सरकारी व स्वायत्त अभियांत्रिकी संस्थेच्या व्यवस्थापन विभागाच्या नॅशनल मॅनेजरियल सोसायटीतर्फे आयोजित बेस्ट लिंकडं इन प्रोफाइल ही राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचे विजेतेपद मुडी प्र. डांगरी ता. अमळनेर येथील रहिवाशी तसेच कोकणातील खालापूर येथील विश्वनिकेतन तंत्रज्ञान अभियांत्रिकी व उद्योजकता महाविद्यालयातील संगणक शास्त्र व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक व विभागप्रमुख प्रा. शशिकांत पाटील यांना मिळाले आहे.
या राष्ट्रीय स्पर्धा दोन टप्प्यात घेतील असून प्रथम फेरीत देशभरातून बेस्ट लिंक्ड इन प्रोफाइल साठी नामांकन अर्ज मागविण्यात आले होते व त्यातून साधारण २५ स्पर्धकांची निवड करण्यात आली होती व अंतिम फेरीत नॅशनल मॅनेजरियल सोसायटीतर्फे या स्पर्धकांची नामांकन लिंक्ड इन या व्यावसायिक वेबसाईट वर केवळ ४८ तासांसाठी प्रकाशित करण्यात आली होती. या मर्यादित ४८ तासात ज्या प्रोफाईलला जास्तीत जास्त कॉमेंट्स लाईक व शेअर केले जाईल त्या प्रोफाईलला विजेते म्हणून घोषित करण्यात आले.
या स्पर्धेत प्रा. शशिकांत पाटील यांना विजेते म्ह्णून घोषित करण्यात आले असून त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. प्रा. शशिकांत पाटील हे अमळनेर येथील सेवानिवृत्त कलाशिक्षक एस बी पाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव असून अमळनेरचे ज्येष्ठ पत्रकार व दैनिक दिव्यमराठीचे तालुका प्रतिनिंधी चंद्रकांत पाटील यांचे लहान बंधू आहेत.