उर्मिला भोसले ‘राजमाता जिजाऊ गौरव’ या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

पारोळा (प्रतिनिधी) जनकल्याण सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर या सामाजिक संस्थेमार्फत दरवर्षी सामाजिक राजकीय शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांमध्ये उत्तम कार्य करणाऱ्यांचा गुणगौरव केला जातो.
यावर्षी जनकल्याण सामाजिक सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी कोल्हापूर येथील कार्यक्रमात सौ उर्मिला भोसले यांना ,”राजमाता जिजाऊ,’ गौरव या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले त्यांचा शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन अध्यक्ष उदयसिंह पाटील व पदाधिकारी इतर मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.