आमदारांच्या शेतकरी मातेची भेट घेऊन भारावले आ.रोहित पवार

▶️ आ.अनिल पाटलांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट
अमळनेर (प्रतिनिधी)आमचे सहकारी आमदार अनिल पाटील यांच्या मातोश्री आजही स्वतःला शेतकरीच संबोधतात आणि आजही जास्तीतजास्त वेळ काळ्या आईच्या सेवेसाठीच देतात हे अभिमानास्पद असून हीच संस्कृती आम्हाला या राज्यात कायमस्वरूपी टिकवून ठेवायची आहे असे उदगार आ.रोहित पवार यांनी काढले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांचा नुकताच अमळनेर दौरा झाला,प्रत्यक्षात अमळनेर मतदारसंघाचे आ.अनिल पाटील हें नंदुरबार जिल्ह्यात पंचायत राज कमिटीच्या दौऱ्यावर असल्याने ते रोहित पवारांच्या भेटीसाठी उपस्थित राहू शकले नाही परंतु रोहित पवार यांनी स्वइच्छेने आमदार अनिल पाटलांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांची सदिच्छा भेट घेतली.यावेळी आमदारांच्या भावजयी तथा हिंगोणे बु ग्रा प च्या लोकनियुक्त सरपंच राजश्री पाटील यांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले,यावेळी राष्ट्रवादीचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,सर्वांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला,यावेळी आमदारांच्या मातोश्रींचे आशीर्वाद घेतल्यानंतर त्या आपली आवड म्हणून अनेक वर्षांपासून स्वतः शेती कसत असताना आजही त्या या वयात काळ्या आईची सेवा करीत असल्याचे एकूण भावुक झाले,याशिवाय राजश्री पाटील या देखील शेतीशी एकरूप असल्याचे एकूण त्यांचेही कौतुक केले,त्यांच्याशी शेतीविषयी सविस्तर चर्चा केल्यानंतर एकीकडे काही लोक मोठे झाल्यानंतर शेतीपासून दुरावत असताना आमच्या आमदारांचे कुटुंब शेतीशी नाळ जोडूनच असल्याने खऱ्या अर्थाने ते भूमिपुत्र असल्याची भावना व्यक्त केली.सर्वांची भेट घेऊन त्यांनी निरोप घेतला.
