सुनिता पाटील यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित!

अमळनेर(प्रतिनिधी) बालरक्षक प्रतिष्ठान द्वारा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शिक्षक सन्मान सोहळा अग्निहोत्री काॅलेज परिसर वर्धा येथे संपन्न झाला.
बालरक्षक प्रतिष्ठान चे वतीने संपुर्ण भारतातील १०७ शिक्षकांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सन्मान देण्यात आला.यावेळी सुनिता भागवत पाटील ,जि प केंद्रशाळा वावडे ता अमळनेर जि जळगाव यांना बालरक्षक प्रतिष्ठानचा राष्ट्रपिता महात्मा गांधी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार मा.ना. श्री ना गो गाणार शिक्षक आमदार नागपूर विभाग यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
येथील जय महाकाली शिक्षण संस्था येथे हा कार्यक्रम पार पडला. मंचावर जय महाकाली शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पं.शंकरप्रसाद अग्निहोत्री, ना श्री ना गो गाणार शिक्षक आमदार नागपूर विभाग, डॉ रविंद्र रमतकर साहेब संचालक राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर , डॉ. डी.डी सूर्यवंशी प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नाशिक, डॉ. मंगेश घोगरे प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वर्धा, मेघश्याम ढाकरे प्राचार्य विद्याविकास महाविद्यालय , समुद्रपूर ,अजय भोयर विभाग कार्यवाहक म रा शिक्षक परिषद नागपूर आदी मान्यवर उपस्थित होते. हा पुरस्कार त्यांच्या शैक्षणिक, शिक्षा संस्कृती, मानवी मूल्यांचे जतन तसेच सातत्याने समाजासाठी सेवाभाव अर्पण करणे, तसेच समाज शिक्षित होण्यासाठी सातत्याने समाजकार्य समुपदेशन या वृत्तपत्रीय लिखाणातून समाजजागृती या अशा विविध कार्यात त्यांचा वैशिष्य पूर्ण सहभाग लक्षात घेता त्यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांची या पुरस्कारासाठी
निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. देशभरातून अनेक राज्यातील शिक्षकांना आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देवुन गौरविण्यात आले.
बाल रक्षक प्रतिष्ठान महाराष्ट्रातील एक सेवाभावी संस्था असून या संस्थेमार्फत शाळाबाहा मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करण्याचे तसेच अशा विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक कार्यक्रम घेण्याचे कार्य करत आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व शैक्षणिक साहित्य पुरविण्याचे कार्य करत आहे. या संस्थेशी भारतातील २२ राज्याचे शिक्षक व विदेशातील शिक्षक व विद्यार्थी जोडले गेले असून भारतासह जागतिक स्तरावर ही
संस्था कार्य करत आहे.
बालरक्षक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष मनोज चिंचोरे तर सचिव नरेश वाघ यांचे कुशल नेतृत्व बाल प्रतिष्ठानला लाभले असून शैक्षणिक कार्यात ते स्वतला बाहून घेत शिक्षकांच्या रचनात्मक शैक्षणिक कार्याला समजून घेत अशा शिक्षकांचा गौरव करत आहे.