गं.भा.चंद्रभागाबाई भदाणे यांचे निधन; शेवाळी येथून शुक्रवारी निघणार अंत्ययात्रा

धुळे (प्रतिनिधी)- शेवाळी (दा.) ता. साक्री येथील रहिवासी गं.भा.चंद्रभागाबाई सुकलाल भदाणे (वय- 94) यांचे आज सकाळी 11 वाजून 15 मिनिटाने वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी शुक्रवारी (ता. 22 ऑक्टोबर) सकाळी 11 वाजता शेवाळी येथील राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांचा दशक्रिया विधी व गंधमुक्तीचा कार्यक्रम सोमवारी (ता.25 ऑक्टोबर) ला होणार आहे. अशोक भदाणे, गुलाबराव भदाणे, विलास भदाणे, रवींद्र भदाणे, संजय भदाणे यांच्या त्या मातोश्री तर केंद्रीय मंत्रीचे अतिरिक्त खासगी सचिव डॉ सचिन गुलाबराव भदाणे यांच्या आजी होत.