हवालदारही पदोन्नती ने होणार पोलीस उपनिरीक्षक!

मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पोलीस हवालदारांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे – यामुळे राज्यातील हवालदारांचे आता पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
या निर्णयामुळे पोलीस शिपाई संवर्गातील हवालदाराना कमी कालावधीत अधिकारी पदावरून सेवानिवृत्त होता येईल.
राज्य शासनाने म्हटले आहे की, या निर्णयामुळे आता पोलीस शिपायांना त्यांच्या सरासरी 35 वर्षाच्या सेवाकालावधीमध्ये, पोलीस उपनिरीक्षक पदावरुन सेवानिवृत्त होता येईल
तसेच पोलीस शिपायांना सर्वसाधारण पोलीस नाईक, पोलीस हवालदार, सहायक पोलीस उपनिरीक्षक अशा तीन पदोन्नतीच्या संधी मिळतात
यामध्ये एका पदावर 10 वर्षे सेवाकालावधीनंतर पदोन्नती मिळायला पाहिजे,मात्र वरच्या श्रेणीतील पदसंख्या कमी असल्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागतो,असे राज्य शासनाने सांगितले.