चोपडा कलाशिक्षक संघाचा नवरात्र दुर्गोत्सवानिमित्त नाविन्यपूर्ण उपक्रम!

0

चोपडा- (प्रतिनिधी)अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कला शिक्षक संघ पुणे संलग्नित चोपडा कला शिक्षक संघाने ” नवरात्र दुर्गोत्सव ” निमित्ताने संपूर्ण चोपडा तालुक्यातील चित्रकला शिक्षकांसाठी एक आगळीवेगळी “फलक रेखन- लेखन स्पर्धा” आयोजित केलेली होती. या स्पर्धेत कलाशिक्षकांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला. स्पर्धेमध्ये प्रथम :- आर. टी. सोनवणे कलाशिक्षक सी. बी. निकुंभ माध्यमिक विद्यालय घोडगाव ) द्वितीय :- व्ही. डी. पाटील ( कलाशिक्षक महिला मंडळ माध्यमिक विद्यालय चोपडा )
तृतीय:- राकेश रा.विसपुते (कलाशिक्षक विवेकानंद विद्यालय चोपडा )यांची निवड करण्यात आली.स्पर्धेला परीक्षक म्हणून प्रल्हाद सोनार
( उपमुख्याध्यापक तथा कलाशिक्षक महात्मा ज्योतिबा फुले मल्टीटेक माध्यमिक विद्यालय शिरपूर जिल्हा धुळे ) व चतुर्भुज शिंदे ( कलाशिक्षक आदर्श हायस्कूल आडगाव ता.शहादा जि.नंदुरबार ) यांनी कामकाज पाहिले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी सुनील पाटील (अध्यक्ष कलाशिक्षक संघ चोपडा ), अर्जुन कोळी ( सचिव कलाशिक्षक संघ चोपडा ) व कार्यकारिणी पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेसाठी प्राचार्य राजेंद्र महाजन , ए. पी. पाटील ( सेवानिवृत्त कलाशिक्षक ), दिनेश बाविस्कर ( जिल्हा उपाध्यक्ष )व वसंत नागपुरे ( जिल्हा उपाध्यक्ष ) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!