राज्य सरकारचा मोठा निर्णय; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार अनुदान!

मुंबई (वृत्तसंस्था) गारपीट व अवकाळी पावसामुळे मार्च २०२१ मध्ये कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, तसेच नागपूर या विभागातील जिल्ह्यांमध्ये शेतीपिकांचे आणि फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे – तसेच १२२ कोटी २६ लाख ३० हजार रुपयांचा निधी सुद्धा मंजूर केला आहे.
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले , ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचे ३३ टक्के किंवा त्याहून अधिक नुकसान झाले आहे – अशा शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे.
▶️ अशी मिळणार विभागानुसार मदत
● कोकण – २९ लाख ३० हजार रुपये
● पुणे – ३ कोटी १६ लाख ७५ हजार रुपये
● नाशिक – ५९ कोटी ३६ लाख ३४ हजार रुपये
● औरंगाबाद – १५ कोटी ५१ लाख ५४ हजार रुपये
● अमरावती – ३८ कोटी ८७ लाख ५६ हजार रुपये
● नागपूर – ५ कोटी ४ लाख ८१ हजार रुपये