तालुक्यात अतिवृष्टी मुळे पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारच!-आ.अनिल पाटील

▶️ पळासदडे येथे गाव दरवाजा, सामाजिक सभागृह व मोरी बांधकामाचे भूमिपूजन
अमळनेर(प्रतिनिधी) तालुक्यात यंदा अतिवृष्टीमुळे शेतकरी राजा प्रचंड आर्थिक संकटात आला असून माझ्या या बांधवाना न्याय मिळवून देण्यासाठी माझे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत,या संकटातून सावरण्यासाठी शासनदरबारी माझा पाठपुरावा सुरू असल्याने मायबाप शासन कोणत्याही परिस्थितीत आपल्याला आधार देईलच अशी ग्वाही आमदार अनिल पाटील यांनी पळासदडे येथे आयोजित विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी ग्रामस्थांना दिली.
पळासदडे येथे मोरी बांधकाम, भिल्ल वस्तीत सामाजिक सभागृह आणि 6 लाख निधीतून गावदरवाजाचे भूमिपूजन आ.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले,आमदारांचे गावात आगमन होतात ग्रामस्थांनी जल्लोषात त्यांची मिरवणूक काढून स्वागत केले.आपल्या भाषणात पुढे आ.पाटील म्हणाले की पळासदडे गावाने माझ्यावर सदैव प्रेम केले असल्याने विकासकामांच्या रूपाने मी त्याची परतफेड करीत आहे,हेच गाव नाही तर मतदारसंघातील विकासापासून वंचित राहिलेल्या गावांना विकासाची नांदी आणल्याशिवाय व राहणार नाही अशी ग्वाही आमदारांनी दिली,तसेच यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी व्यायामशाळेसाठी साहित्य मागितल्याने त्याचीही लवकरच पूर्तता करण्याची हमी आमदारांनी दिली,याशिवाय ग्रामस्थानी देवळी रस्त्याची मागणी आमदारांकडे केली या मागणीलाही सकारात्मक प्रतिसाद आमदारांनी दिला.यावेळी मोठ्या थाटात आमदारांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बाजार समितीचे प्रशासक एल टी पाटील,काँग्रेस किसान सेलचे तालुकाध्यक्ष प्रा सुभाष पाटील, पळासदडे सरपंच रवींद्र बोरसे,उपसरपंच वैशाली पाटील
पोलीस पाटील संजय पाटील,सदस्य रमेश पाटील, सहादु भिल, नाना भिल, सुषमाबाई पाटील, कल्पनाबाई पाटील तसेच ग्रामस्थ मंडळीत
भिकन पाटील,गुलाब पाटील,नाना पाटील,गुलाब पाटील,ग्रामसेवक आर.एल.पाटील,पांडुरंग पाटिल, कैलास भिल,आनंदा बोरसे,रणछोड बोरसे,बाळू भिल,युवराज भिल,सोमा भिल,वना मांग, गोरख मौलगिर,रावण भिल,वडार समाज तालुकाध्यक्ष संजू शिंदे,मनोज पाटील,अजय पाटील,शिवानी पाटील,सोनू पाटील,भुवा पाटील,शरद पाटील, सारजाबाई भिल,सीताबाई भिल,आशाबाई,राजेंद्र पाटिल, चुडामन पाटील,सुपडू रामदास,समाधान भिल,देविदास पाटिल,पंडित पाटिल,सुरेश फकिरा, मनोज धुडकू, अरुण पाटील, मनोज पाटील याशिवाय सर्व ग्रामस्थ मंडळी पळासदळे व माऊली ग्रुप सदस्य उपस्थित होते.
