भिलाजी बागुल यांचे दुःखद निधन!

अमळनेर (प्रतिनिधी) येथील कृषीविकास कॉलनी तील रहिवासी निवृत्त ग्रामसेवक भिलाजी दामू बागुल (वय-६८) यांचे अल्प आजाराने निधन झाले. ते बोहरे (ता अमळनेर) येथील मूळ रहिवासी आहेत. रामेश्वर खु (ता.अमळनेर) येथील जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शिक्षक योगेश पाटील, धुपी (ता.चोपडा) जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शिक्षक मुकेश पाटील यांचे वडील तर, माध्यमिक शिक्षक संजय बागुल यांचे काका होत.