भिलाली येथे आदर्श शिक्षकाचे पुण्यस्मरण स्मरणार्थ केले आदर्श उपक्रम!

पारोळा(प्रतिनिधी) तालुक्यातील भिलाली येथील आदर्श शिक्षक स्वर्गवासी पोपटराव बाजीराव साळुंखे यांच्या प्रथम पुण्यस्मरण त्यांचे चिरंजीव अभियंता बापूराव साळुंखे व माध्यमिक शिक्षक शामकांत साळुंखे व परिवाराने समाज उपयोगी चांगल्या गोष्टींचा उपक्रम राबवून वडिलांना स्मरण केले. या त्यांच्या उपक्रमाने वेगळा ठसा उमटवला .
मागील वर्षी वयाच्या ऐंशीव्या वर्षी पोपटराव नानांचे निधन झाले 28 सप्टेंबर रोजी वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणच्या निमित्ताने त्यांच्या सर्व कुटुंबाने गावासाठी असलेले संत सोमगिर परिसरात दुरुस्ती व रंगकाम केले. भजनी मंडळे व वाचनालयात पुस्तके संच भेट ,गावास ग्राम वार्ता फलक भेट, रस्ते साफसफाई, वृक्षारोपण अशा ग्राम उपयोगी आदर्श कामांनी वडिलांना पुण्यस्मरण वाहिले.

यावेळी संत सोमगिर महाराज भजनी मंडळास सकल मराठा समाज ठाणे जिल्हाध्यक्ष रमेश दादा आंब्रे यांच्या हस्ते पुस्तक भेट दिली. श्री गजानन महाराज भजनी मंडळास श्री व्ही एन मराठे सेवा निवृत्त मुख्य अभियंता,साक्री यांच्या हस्ते पुस्तक भेट दिली, श्री विलास पाटील गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर भुसावळ,यांच्या हस्ते वाचनालयास पुस्तक भेट दिले.यावेळी स्नेहल ताई रमेश आंब्रे अध्यक्ष शिक्षण समिती,ठाणेमहानगरपालिका यांच्या हस्ते ग्रामवार्ता फलक अनावरण करण्यात आले. यावेळी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साळुंखे कुटुंबाच्या आदर्श शिक्षकाचे पुण्यस्मरण या आदर्श उपक्रमांनी केल्याने त्यांचे कुटुंबाचे कौतुक गावात व परिसरात सर्वच लोक करत आहेत.

