जवाहर नवोदय परीक्षेत जि.प.देवपिंप्री शाळेचे घवघवीत यश!

जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जिल्हा परिषद देवपिंप्री शाळेच्या तीन विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय विद्यालयातील इ.६वी वर्गाच्या प्रवेशपूर्व निवड परीक्षेत घवघवीत यश संपादक केले.या गुणवंत विद्यार्थ्यांचा व वर्गशिक्षक श्री. योगेश क्षीरसागर यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कु.कल्पेश सुदाम पाटील(९५%),कु.भावेश गणेश सोनवणे(९५%) व दुर्गेश प्रवीण चिकटे(९३%) या विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाच्या जोरावर हे यश मिळविले.या विद्यार्थ्यांना त्यांचे वर्गशिक्षक श्री. योगेश क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले.कोरोनाच्या काळात शाळा बंद असतांना मोबाईलच्या साहाय्याने ऑनलाईन शिक्षण देऊन तसेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष घरी भेट देऊन शिकविले त्याचे समाधान वाटते,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य संधी उपलब्ध करून दिली तर ते प्रामाणिक प्रयत्न करून यश मिळवितात,असे मत क्षीरसागर सर यांनी व्यक्त केले.
सदर गुणवंत विद्यार्थ्यांचा व वर्गशिक्षक क्षीरसागर सर यांचा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय हिंगणे व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विकास पाटील,शिक्षक प्रशांत पाटील,पुरुषोत्तम कोळी,भगवान चौधरी, राजेश पाटील इ.उपस्थित होते.