कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंप तत्त्वावर तात्काळ नियुक्त्या द्या !-आ. कपिल पाटील

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात ओबीसी आरक्षण हक्क परिषदेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शनिवारी (ता 25 सप्टेंबर) रोजी मुंबई येथील शिक्षक भारतीचे शिक्षक आमदार मा.कपिल पाटील जळगाव येथे आले होते. हॉटेल रॉयल पॅलेस येथे प्रा. सुनील गरुड यांनी कपिल पाटलांची भेट घेऊन कनिष्ठ महाविद्यालयाच्या समस्यांच्या विषयी जवळपास वीस-पंचवीस मिनिट चर्चा केली. त्यात विशेषतः वाढीव पदांच्या शासन मान्यता बाबतीत हा प्रश्न असेल त्याच बरोबर कनिष्ठ महाविद्यालयाचे पगार राष्ट्रीय बँकेत झाले पाहिजे, याविषयीची प्रश्न असतील, पायाभूत पदाचा संदर्भामध्ये शासनाकडून 2012 नंतरची पदे प्रलंबित आहेत ते मंजूर करण्यासंदर्भात कार्यवाही व्हावी.कोरोना महामारी मुळे ज्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा अकाली मृत्यू झाला अश्या मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना तात्काळ अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या देऊन त्यांच्या मान्यता प्रदान कराव्यात त्यासाठी शालार्थ क्रमांक वेगळा न देता मृत असलेल्या कर्मचाऱ्यांचा शालार्थ क्रमांक जो असेल तोच अनुकंपा तत्त्वावर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला तात्काळ अदा केला जावा अशा प्रश्नांची चर्चा करत असताना कपिल पाटील यांनी एक वेगळ्या पद्धतीचे तत्त्व शासनाने अंगीकारावे. कर्मचारी यामुळे मृत्युमुखी पडला असेल अशा कर्मचाऱ्याला त्याच्या सेवानिवृत्तीच्या नियत वयोमानानुसार पर्यंत शासनाने त्या कुटुंबाला पगार सुरू ठेवावा आणि कर्मचाऱ्यांचे 58 वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर त्याला पेन्शन सुरू करावे. अनुकंपाची भरती करावयाची नसेल तर मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार तो नियमित सुरू ठेवावा, वयाच्या 58 व्या वर्षापर्यंत अशा पद्धतीची योजना मी शासनाला सुचविणार आहे. त्यासंदर्भात शासनाला अंमलबजावणी करण्यासाठी कार्यवाही करायला सांगणार आहे. मृत कर्मचाऱ्याच्या अनुकंपा तत्त्वावर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याला मान्यता देत असताना त्याला शालार्थ आयडी ची अट असू नये अशी आग्रही मागणी, मी शिक्षण विभागाकडे करणार आहे असे देखील त्यांनी मत व्यक्त केले. याप्रसंगी शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष नारायण वाघ (माध्य.) अजयकुमार साळुंखे, सोमनाथ पाटील (प्राथ,जिल्हाध्यक्ष ), सुशिल पाटील. पंकज गरुड असे अनेक शिक्षक भारतीचे कार्यकर्ते उपस्थित होते चर्चा करतेवेळी संघटनेचे सेक्रेटरी शैलेश राणे यांनी भ्रमण ध्वनी वरून कपिल पाटील यांच्याशी संवाद साधून सदरच्या प्रश्नांची उकल आपण शासन स्तरावर करावी अशी विनंती केली यावेळी गजानन गव्हारे , मिलिंद पाटील हे देखील प्रा.शैलेश राणे यांच्या समवेत भेटायला आले होते . परंतु आमदार कपिल पाटील यांना ओबीसी हक्क परिषद च्या कार्यक्रमाला जायचे असल्यामुळे फक्त भ्रमण दूरध्वनी वरून संवाद साधला.