अनंत भोसले हे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित!

कोल्हापूर (प्रतिनिधी) येथे आज 25 रोजी सरपंच सेवा संघ,महाराष्ट्र राज्य यांच्या कडून ‘मान नेतृत्वाचा सन्मान कर्तुत्वाचा’ राज्यस्तरीय “आदर्श शिक्षक पुरस्कार” अनंतराव हिलाल पाटील व सहपरिवार यांना सरपंच सेवा संघाचे सरचिटणीस बाबासाहेब पावसे व मान्यवरांच्या हस्ते भगवती हाँल, कोल्हापूर येथे प्रदान करण्यात आला.
भोसले सर यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे शैक्षणिक कार्याबरोबर सांस्कृतिक, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड, कोराना-19 या काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधी मदत, तसेच गरीब व गरजू लोकांना किराणा किट वाटप, कोल्हापूरची पूरग्रस्त परिस्थिती मध्ये सरपंच सेवा संघ महाराष्ट्र व जनकल्याण सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत करणे. 8 मार्च रोजी महिलांचा सन्मान करणे अपंग दिनाच्या निमित्ताने अपंग व्यक्तीचा सन्मान करणे आदी सामाजिक उपक्रम राबविले आहेत.
अशा प्रकारे त्याचे कार्य सतत चालू असते म्हणून आतापर्यंत अनेक समाजिक संस्थानी त्यांच्या कार्याची दखल घेत त्याना 80″कोरो़ना योद्धा” व तसेच “आदर्श शिक्षक” “समाजसेवा रत्न” राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने गौरविण्यात आले. या सर्व सन्मानार्थ यांचे अभिनंदन व कौतूक होत आहे.