शिक्षकांसह शिक्षण क्षेञातल्या विविध समस्यां सोडविणार!- आमदार विक्रम काळे

जळगाव (प्रतिनिधी) विधान परिषदेचे आमदार विक्रम काळे यांनी आज प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण क्षेञातल्या शिक्षकांच्या समस्यांवर संवाद साधला. पंचायत राज कमिटी अंतर्गत जळगाव जिल्हा दौऱ्यावर आलेले आमदार काळे हे आज सायंकाळी प्रा.सुनिल गरुड यांच्या निवासस्थानी द्वारदर्शनासाठी आले होते. प्रा गरुड सर यांचे शालक कै. प्रमोद मोरे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते.त्या प्रसंगी ते बोलत होते.
आमदार श्री काळे यांनी सर्व प्रथम शिक्षकांचे वेतन १ ते ५ तारखेच्या आत झाले पाहीजे, अशी व्यवस्था प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी करावी.त्यासाठी C.A.M.P. प्रणालीतून व्हावे. वेतन व भविष्यनिधी कार्यालयाने देखील माध्यमिक,उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन १ ते ५ च्या दरम्यान व्हावेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणी अॉन प्रशिक्षण कार्यक्रम दहा दिवसाचा लागू करण्याचा शासन निर्णय झालेला आहे. सैनिकी शाळांच्या तुकड्यांचा प्रश्नाकरीता ३ ऑक्टोबर २०२१ ला आमदार सुधीर तांबे, आमदार विक्रम काळे तसेच आयुक्तांसोबत बैठक होणार असल्याचे तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या पायाभूत पदांचा प्रश्न देखील मी सोडविणार असल्याचे ही श्री काळे यांनी सांगितले. यावेळी प्रा.सुनिल गरुड, प्रा.पी.पी.पाटील, प्रा. शैलेश राणे, सेवानिवृत्त एस.वाय.पाटील, भास्कर फुलपगार, धनंजय चौधरी, शशिकांत पाटील, सेवानिवृत्त पी.एस.आय अशोक पाटील, प्रशांत गरुड, संगेश सुर्वे आदी उपस्थित होते. यावेळी सुनिल सोनार व उमेश काटे यांनी राज्यातील सैनिकी शाळा व कनिष्ठ प्राध्यापकांचे प्रश्न मांडले. पंकज रमेशराव गरुड यांनी आभार मानले.