राज्यात पुन्हा जोरदार पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

मुंबई (वृत्तसंस्था)राज्यात १९ सप्टेंबरपासून अनेक ठिकाणी विजांच्या कडकडासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे
➡️ अशी असणार पुढील स्थिती
▶️ १९ सप्टेंबरला – नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे – तर उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहील
▶️ २० सप्टेंबरला – नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, भंडारा, गोंदिया तसेच गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे
▶️ २१ सप्टेंबरला – पालघर, अमरावती, अकोला, वर्धा आणि नागपूर या पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे
➡️ परतीचा पाऊस लांबणार – राज्यात यावर्षी 15 दिवस उशीरा परतीचा पावसाला सुरुवात होणार आहे – असे हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी सांगितले.