तुम्ही स्वतः बदलू शकता रेशन कार्डवरील नंबर!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने नोव्हेंबरपर्यंत मोफत रेशन देण्याची घोषणा केली होती. दरम्यान रेशन कार्डला चुकीचा मोबाईल नंबर दिलेला असेल तर आपल्याला रेशनकार्ड संदर्भात कुठलीही माहिती मिळणार नाही,त्यामुळे आपला चालू नंबर रेशन कार्डला जोडणे आवश्यक आहे,असे केंद्र सरकारने सांगितले.
▶️ असा बदला मोबाइल नंबर
➡️ मोबाइल नंबर बदलण्यासाठी – सर्वप्रथम nfs.delhi.gov.in/Citizen/UpdateMobileNumber.aspx या संकेतस्थळावर जा – समोर एक पेज उघडेल यामध्ये आपली माहिती भरा.
➡️ नंतर घराच्या प्रमुख व्यक्तीचा आधार क्रमांक टाका – तसेच रेशन कार्ड क्रमांक टाका नंतर प्रमुखाचे नाव लिहा त्यानंतर शेवटी आपला नवीन मोबाईल नंबर टाका – नंतर सबमिट बटनावर क्लिक करा.