आदर्श शिक्षक स.ध.भावसार तर्फे बक्षीस वितरण व गुणीजनांचा सत्कार!

0

पारोळा (प्रतिनिधी) राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार तर्फे मातोश्री कै.सौ.शांताबाई धडू भावसार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तालुका स्तरीय बक्षीस समारंभ व गुणी जनांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी किसान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ यशवंत पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार अभय पाटील होते.
सदर समारंभात महाविद्यालयात प्रत्येक शाखेत व प्रत्येक विषयात प्रथम क्रमांकाच्या एकुण १७ विद्यार्थ्यांना १५०/- रुपये रोख बक्षीस व गौरव पत्र अभय पाटील व प्राचार्य डॉ यशवंत पाटील यांच्या हस्ते देण्यात आली. ९० टक्क्याचे वर गुण मिळालेले विद्यार्थी राधिका ठाकरे,अक्षय पवार, मृणाल सैंदाणे व मयुरी पाटील यांना स्मृतीचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला.
गुणी जनांचा सत्कार याच समारंभात सिनेट सदस्य प्रा.डा अजय पाटील,उत्कृष्ट शिक्षक प्रथा डॉ गुणवंत सोनवणे, उत्कृष्ट कर्मचारी पंडित माळी, जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर झालेल्या वैशाली नांद्रे व सीमा पाटील यांना शाल, श्रीफळ व पुष्पहार/पुष्पगुच्छ देऊन आयोजक स.ध.भावसार यांनी सत्कार केला. विद्यार्थीनी निराली व दर्शना पाटील आणि सत्कारार्थी प्रा.डा अजय पाटील,प्रा डॉ गुणवंत सोनवणे व सीमा पाटील यांनी आपल्या मनोगतात भावसार सरांविषयी आदर व्यक्त करुन आभार मानले‌. तसेच प्राजक्त फाउंडेशन तर्फे अध्यक्ष बंडू नाना वाणी यांनी स.ध. भावसार सरांच्या कार्याची दखल घेऊन सन्मान पत्र प्रदान केले.


प्रमुख अतिथी अभय पाटील यांनी सरांची सामाजिक बांधिलकी व उपक्रमातील सातत्य ( १७ वे वर्ष )या विषयी आदर व्यक्त करुन यशवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ यशवंत पाटील यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीविषयी मार्गदर्शन करुन अपार मेहनतीने अवघड ध्येय सुद्धा साध्य करता येते हे विविध उदाहरणा द्वारा स्पष्ट केले.तसेच मूल्ये व संस्कार आचरणात आणण्याचे आवाहन देखील केले.
समारंभाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन आयोजक स.ध. भावसार यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा डॉ प्रदीप औजेकर यांनी केले. समारंभास प्राजक्त फाउंडेशनचे अध्यक्ष बंडू नाना वाणी, भावसार समाज अध्यक्ष ओंकार गै भावसार सह सर्व बक्षीस पात्र विद्यार्थी व पालकही उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सुरेश लोटन पाटील, ईश्वर ठाकरे, निंबा साळी व अमोल भावसार यांचे सहकार्य लाभले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!